आज नागपूर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामना आयोजित करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुरळीत व्यवस्था व आपत्कालीन सेवांना अडथळा येऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
उपायुक्त पोलीस (वाहतूक) लोहित मातानी यांनी सांगितले की, सामन्याच्या वेळेत वर्धा रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती सुरळीत हाताळण्यासाठी स्टेडियमकडे ये जा करण्यासाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. तसेच दुचाकी, चारचाकी, शालेय बस, व्हीआयपी, व्हीसीए सदस्य, पोलीस कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
🚦 नागरिकांसाठी महत्त्वाच्या वाहतूक सूचना
- ठरवलेल्या मार्गांवरूनच प्रवास करा व वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करा
- नो-पार्किंग झोनमध्ये वाहन उभे करू नका
- दुचाकीस्वारांनी हेल्मेट व चारचाकी चालकांनी सीट बेल्ट वापरणे अनिवार्य
- मद्यप्राशन करून वाहन चालवू नका
- अनावश्यक हॉर्न व वेगाने वाहन चालवणे टाळा
- सार्वजनिक वाहतूक व कार-पूलचा जास्तीत जास्त वापर करा
🚑 आपत्कालीन सेवांना प्राधान्य द्या
- रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलिस वाहनांना तत्काळ मार्ग द्या
- गर्दीच्या ठिकाणी थांबून फोटो/व्हिडिओ काढणे टाळा
🤝 आपले सहकार्य आमची सुरक्षितता
आपल्या थोड्याशा सहकार्यामुळे
✔️ वाहतूक कोंडी टाळता येईल
✔️ अपघातांची शक्यता कमी होईल
✔️ सामना शांततेत व आनंदात पार पडेल
वाहतूक नियम पाळा, सुरक्षित रहा, खेळाचा आनंद घ्या.


